Monday, May 5, 2008

मुगाच्या डाळीचा हलवा

साहित्य:
१. मुगाची डाळ - २ वाट्या
२. वनस्पती तूप/ अल्मंडबटर/कॅश्युबटर/ अन्सॉल्टेड मार्जरीन - २ वाट्या
३. अल्मंडमिल्क - २-३ वाट्या किंवा १ वाटी बदाम
४. साखर - २ ते ३ वाट्या
५. पाणी

लिहिण्याच्या सोयीसाठी साहित्य क्रमांक २. व ३.करता अनुक्रमे तूप व दूध असं लिहिणार आहे.

कृती:
१. सर्वप्रथम मुगाची डाळ पाण्यात भिजत घालावी व मिक्सरमध्ये किंवा पाट्या-वरवंट्यावर वाटून घ्यावी.वाटण्यासाठी साहित्य नसल्यास कुकरमध्ये शिजवून डावाने ढवळून बारीक करावी.
२. कढईमध्ये किंवा नॉनस्क्टिक पात्रात २ वाट्या तूप घालावे व त्यात वाटलेली डाळ घालावी व थोडी परतून घ्यावी.
३. पाणी घालून शिजवून घ्यावी. (क्रमांक १ मध्ये शिजवली असल्यास हा मुद्दा गैरलागू)
४. थोडं दूध घालून कढईपासून गोळा सुटून येईल तोवर हलवत रहावं.
५. साखर घालावी व व्यवस्थित एकत्र होण्यासाठी मिश्रण ढवळावं.
६. उरलेलं दूध घालून क्र. ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे हलवावं व विस्तव बंद करावा.

हा हलवा आठवडाभर चांगला राहतो. यात आवडीनुसार सुकामेवा, जायफळपूड, वेलचीपूड, केशर घालता येईल. केशर घालायचे असल्यास वाटीभर पाण्यात केशर घालून झाकलेल्या पात्रात ५ मिनिटांसाठी उकळून घ्यावे व ते पाणी वापरावे म्हणजे संपूर्ण मिश्रणात चांगला स्वाद पसरतो. थोडा आमरस किंवा मॅगोपल्प घातल्यास चव फारच उत्कृष्ठ येते.

विशेष सूचना:
अल्मंडमिल्क उपलब्ध नसल्यास वाटीभर बदाम मिक्सरच्या भांड्यात टाकून ते भिजतील इतपत पाणी घालावे व मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नारळाच्या दुधाप्रमाणॆच अल्मंडमिल्क तयार करता येतं. १ लिटर गायी/म्हशीचे दूध सध्या सुमारे २० रुपयांना मिळतं. त्या किंमतीत बसतील एवढे बदाम वापरून अल्मंडमिल्क सहज बनवता येईल. अल्मंडमिल्क बनवल्यावर उरलेला चोथा टाकून देऊ नये. हलव्यामध्ये घालता येतो.

6 comments:

मोरपीस said...

नावावरूनच ब्लॉगचा विषय कळला खूप मस्त वाटल माझ्या आवडीचा विषय हाताळल्याबद्दल

खादाड said...

मोरपीस,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

kasakaay said...

Khadad,
Thank you for starting this blog. Looking forward to more recipes.

खादाड said...

kasakaay,
Thank you for visiting this blog. I hope you enjoy the recipes given in this blog.

रुचिरा said...

'Khadad'..blog che naav chan aahe..maza pan recipes warchach blog aahe..mazya blog la wel milala tar aawashya bhet dya.

kasakaay said...

I have linked this blog thru my blog. Please check under Vegna/वन्यज/हरितज

या ब्लॉगविषयी

व्हिगन/वन्यज/हरितज आहारपद्धतीबद्दल कसंकाय यांच्या ब्लॉगवर बरीच माहिती मिळाली. भारतीय संस्कृतीत पाककृतींमध्ये दुध, दही, तूप यांचा समावेश असलेले अनेक पदार्थ पूर्वापार लोकप्रिय आहेत. "दूध-तूप सोडायचं, मग हे पदार्थ कसे करणार?" हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. व्हिगन जीवनशैली टाळण्यामागे ही महत्त्वाची बाब आहे हे लक्ष्यात घेऊन व्हिगनपद्धतीने पदार्थ बनवण्याचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मी स्वत: व्हिगन नसल्यामुळे लोकांना "दूध-तूप खाऊ नका" असा सल्ला देणार नाही. त्याप्रमाणेच, या ब्लॉगवरील सर्व पाककृती व्हिगन/वन्यज/हरितज जीवनशैलीशी सुसंगत असतीलच असं नाही. पण एक प्रयोग म्हणून इथल्या पाककृती अवश्य करून पहाव्यात ही विनंती.
आपल्याला ह्या पाककृती कशा वाटल्या हे अवश्य कळवावे.
धन्यवाद.

-खादाड