या ब्लॉगवर या पुढे प्रसिद्ध होणार्या पाककृतींमध्ये पूर्वतयारीत वारंवार लागणार्या वस्तूंची कृती इथे देत आहे.
१. कोथिंबीरीची पेस्ट
कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत वाटून घ्यावी. ही पेस्ट फ़्रिजमध्ये २ आठवडे चांगली राहते. कोथिंबीरीपेक्षा ही पेस्ट वापरायला सोपी जाते. साधारणपणे वाटीभर कोथिंबीरीसाठी १ डाव पेस्ट हे प्रमाण आहे.
२. कढिपत्ता पूड
कढीपत्ता अधिक टिकावा, म्हणून थोड्या तेलावर परतून घ्यावा व मिक्सरमधून त्याची पूड करून घ्यावी.
माझ्या दृष्टीने खादाड शब्दाची व्याख्या म्हणजे "चोखंदळपणे विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची आवड असलेला मनुष्य". माझ्या खादाडपणाचे साक्षीदार होऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे स्वागत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
या ब्लॉगविषयी
व्हिगन/वन्यज/हरितज आहारपद्धतीबद्दल कसंकाय यांच्या ब्लॉगवर बरीच माहिती मिळाली. भारतीय संस्कृतीत पाककृतींमध्ये दुध, दही, तूप यांचा समावेश असलेले अनेक पदार्थ पूर्वापार लोकप्रिय आहेत. "दूध-तूप सोडायचं, मग हे पदार्थ कसे करणार?" हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. व्हिगन जीवनशैली टाळण्यामागे ही महत्त्वाची बाब आहे हे लक्ष्यात घेऊन व्हिगनपद्धतीने पदार्थ बनवण्याचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मी स्वत: व्हिगन नसल्यामुळे लोकांना "दूध-तूप खाऊ नका" असा सल्ला देणार नाही. त्याप्रमाणेच, या ब्लॉगवरील सर्व पाककृती व्हिगन/वन्यज/हरितज जीवनशैलीशी सुसंगत असतीलच असं नाही. पण एक प्रयोग म्हणून इथल्या पाककृती अवश्य करून पहाव्यात ही विनंती.
आपल्याला ह्या पाककृती कशा वाटल्या हे अवश्य कळवावे.
धन्यवाद.
-खादाड

No comments:
Post a Comment